हिंदी चित्रपट आंकडा होणार प्रदर्शित
SAZ SARGAM PRODUCTION
हिंदी चित्रपट आंकडा होणार प्रदर्शित
मुंबई: दिनांक, हिंदी चित्रपटाला यश मिळावे म्हणून अंधश्रद्धेवर श्रद्धा असलेले अनेक बॉलीवुड निर्माते आहेत. चित्रपटाचे मुहूर्त तर त्यांना महत्वाचे वाटतातच, पण नावात सुद्धा किती अक्षरे आहेत, किती आकडे आहेत, पहिले अक्षर कोणते, असे अनेक मुद्दे निर्मात्याला पटवून सांगणारे फिल्मी ज्योतिषी पण इथे चांगले पैसे कमावतात. “आंकडा” या चित्रपटात आकड्याचे एक गाणे देखील आहे जे ऐकता क्षणी तालावर नाचायला लावते “ग्यारह ग्यारह सौ के झटके , टच फ्यूज उडाते है, सारी सारी रात बलम प्यासे तडपाते है”. टोनी कक्करचे ‘बिजली का तार’ हे गाणे गाजले आहे. मात्र ह्या सिनेमात “तू बिजली का तार है, मै आंकडा हू” असे तोडीस तोड जवाब देणारे मादक गाणे नायकाच्या तोंडी बघायला मिळणार आहे. तसेच नौटंकी हा युपीचा खास प्रकार बघायला मिळणार आहे.
आंकडा ही उत्तर प्रदेश मधल्या ‘मुफ्तपूर’ गावात घडणारी एक कथा आहे. गावाच्या नावाला शोभेल असे, आकडा (कटिया) टाकून विजेची चोरी सगळेच फुकटे गावकरी करत असतात. गावातील सरपंच कटियाचे ग्लॉरीफिकेशन करून कटिया देवी चे मंदिर उभारून गाव वाल्यांना फसवत आलेला असतो. गावातील काही चांगले तरुण त्याचा पोलखोल करण्यासाठी आणि विजेची चोरी रोखण्यासाठी प्रयत्न करत असतात. गावातील वेगवेगळया लोकांची मानसिकता आणि त्यातून निर्माण झालेले विनोद, प्रेम, लफडी, राग, द्वेष, सस्पेन्स आणि खुन्नस अशी विविधता असलेली फिल्म म्हणजे आंकडा. अडीच तास निख्खळ मनोरंजन करणार्या अशा ह्या चित्रपटाचे संवाद लेखन लीनेश रमेश घाडगे यांनी केलंय. साज सरगम प्रोडक्शनचा हा चित्रपट निर्माण केलाय मुंबई चे चित्रपट वितरक राम परसय्या यांनी.
अहमदनगर जिल्ह्यामधील अक्षय नाना कर्डक यांचे दिग्दर्शन तर दिग्दर्शन सहाय्य अनुराधा सूर्यवंशी, रोशनी नागदेवते, काजल पोठरे यांनी केलंय. सलील मोहन यांचे बिहारचा बाज असलेले तालावर थिरकायला लावणारे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. इब्राहिम खान, सोनाली पटेल, श्रीपर्णा चॅटर्जी, अक्षय कर्डक व भूषण कुमार यांनी वेगळ्या ढंगात गाणी गायली आहेत.
आकडा चित्रपटात सिम्मी दीक्षित, विजयकुमार, उल्हास आढाव यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर सोबत सिने नाट्य अभिनेते रवी देवधर, स्वप्नील गायकवाड, विभावरी देशपांडे, संदेश काळे, सुमीत झा, प्रणिता जगताप, वेदिका मुथा, संगमनेरचे कलाकार सर्वेश सुभाष जोशी, सुरेंद्र गुजराथी, गिरीश सांगळे, विकास खेडकर, शेरमोहम्मद रंगरेज तसेच अशोक चाबुकस्वार, संदेश काळे, शरद चिवे, अनुराधा सूर्यवंशी, रोशनी नागदेवते, आणि सिने अभिनेते जगन खांडेकर व लिनेश घाडगे यांच्या भूमिका आहेत. अहमदनगर मधील डॉ रणजीत सत्रे या चित्रपटात विशेष भूमिकेत दिसतील, सावरगाव घुले मधील कलाकार गोविंद व नितीन घुले तसेच सावरगाव घुले मधील स्थानिक कलाकार यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. रंगभूषा दत्ताजी जाधव तर केशभूषा विशाखा शिंदे यांनी केली. चित्रपटाचे कला दिग्दर्शन परशुराम घुले यांनी अशा पद्धतीने केले की प्रत्यक्ष उत्तर प्रदेश मधील एका गावात आपण गेल्याचा भास होतो. सरपंच राजू खरात व इतर सर्व सावरगाव घुले ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य दिले.
आकडा हा चित्रपट म्हणजे डार्क कॉमेडी अर्थात गूढकथा, गावाचे राजकारण, द्वेष, सस्पेन्स, धमाल, विनोद आणि उत्कृष्ठ गाण्यांचा मालमसाला असून जाताजाता एक सामाजिक संदेश पण देऊन देतो. हा चित्रपट येत्या नोव्हेबर मध्ये संपूर्ण भारतभर प्रदर्शित होईल असे निर्माते राम परसय्या यांनी सांगितले.