सर्वांनी ‘ सायबर साक्षर ‘ होण्याची गरज – सूरज बिजली

सर्वांनी ‘ सायबर साक्षर ‘ होण्याची गरज सूरज – बिजली
सायबर साक्षरचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

नाशिक : प्रतिनिधी
सायबर गुन्हेगारी , फसवणूक सध्या प्रचंड वाढत आहे . यातून जर समाजाला वाचवायचे असेल तर सर्वांनी सायबर साक्षर होणे गरजेचे आहे , असे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी केले . नाशिक येथे सायबर साक्षर या संस्थेचा नुकताच ५ वा वर्धापन दिन साजरा झाला . यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दानिश मन्सुरी , भूषण देशमुख आदी उपस्थित होते . वर्धापन दिनानिमित्त सायबर साक्षर आणि नाशिक सायबर पोलीस यांच्यातर्फे सायबर जनजागृती पोस्टर्सचे अनावरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजली यांच्या हस्ते करण्यात आले.

सायबर साक्षर गेल्या ५ वर्षांपासून सायबर जनजागृतीचे चांगले काम करत असून , त्यांनी हे काम अजून मोठ्या प्रमाणात करावे , असे मत बिजली यांनी व्यक्त केले . तसेच सध्या चालू असणारे विविध फसवणुकीचे प्रकार याबाबत उपस्थितांसोबत चर्चा केली . दानिश मन्सुरी यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले तसेच मार्गदर्शन केले . सोबतच सायबर साक्षरच्या कामाची प्रशंसा केली.

सायबरतज्ज्ञ आणि सायबर साक्षरचे संचालक ओंकार गंधे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले तसेच येत्या काळात काही लाख लोकांना सायबर साक्षर बनविणार सार साक्ष असल्याचा उल्लेख त्यांनी केला. सायबर साक्षर संस्थेमार्फत महाराष्ट्रभर विविध उपक्रम राबवले जातात , शाळा , महाविद्यालये , ऑफिस इत्यादी अनेक ठिकाणी सायबर सुरक्षा प्रशिक्षण शिबिर आणि व्याख्याने सायबर साक्षरतर्फे घेतली जातात . तसेच अगदी बेसिकपासून प्रोफेशनलपर्यंत सायबर सुरक्षा आणि एथिकल हेकिंगचे विविध कोर्सेसही सायबर साक्षरतर्फे घेतले जातात . सायबर साक्षरच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त सायबर सुरक्षा कोर्स पास झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले . यावेळी सायबर साक्षर विद्यार्थी चैतन्य सोनार , ऋतुजा सूर्यवंशी , श्रीरंग भावसार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सर्वांना सायबर साक्षर करण्याची ग्वाही दिली.

सायबर साक्षर उत्तीर्ण विद्यार्थी –

चैतन्य सोनार

सायली दुर्गुडे

श्रीरंग भावसार

साहिल दुर्गुडे

निखिल देसले

साहिल गायकवाड

जान्हवी भिवगडे

लकी अन्सारी

ऋतुजा सूर्यवंशी

सारिका हसे

गौरव काठे

दुर्गेश देवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *