आयुष्यातील कोणत्या छोट्या गोष्टी आपल्याला व्यर्थ ठरवतात?

आयुष्यातील कोणत्या छोट्या गोष्टी आपल्याला व्यर्थ ठरवतात? (What little things in life make you feel worthless?)

 

 

आयुष्य आनंदात, सुखाने आणि समाधानाने जगावं असे प्रत्येक व्यक्तीला वाटतं असत. त्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्नशील असतो. जगातील सर्व सुख, आनंद आपल्यालाच मिळावे. यासाठी तो अथक परिश्रम घेतो. हे सर्व सत्य असले तरी त्याला एक प्रश्न नेहमी सतवत असतो. तो म्हणजे, “ आयुष्य म्हणजे नेमके काय ? ” जन्म आणि मृत्यू यांमधील काळ म्हणजे आयुष्य का ? असा ही प्रश्न त्याला सतत पडत असतो. खरंच आयुष्य म्हणजे काय ? व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यू पर्यंतचा वाढत गेलेला कालावधी की कमी होत गेलेला एक- एक क्षण म्हणजे आयुष्य ? खरे तर आयुष्य म्हणजे व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अनुभवाची शिदोरी. व्यक्ती मध्ये असणारे राग, लोभ, मद, मोह, मत्सर या गुणांची गोळा बेरीज म्हणजे आयुष्य होय. या गुणांचा व्यक्तीच्या जीवनावर होणारा परिणाम म्हणजे आयुष्य. या गुणांमुळे व्यक्तीला खूप काही प्राप्त होते. परंतू त्यापेक्षा जास्त गोष्टी तो गमावून बसतो. या प्राप्त-अप्राप्त कालावधीतील त्याला मिळालेले अनमोल अनुभव म्हणजे आयुष्य नव्हे का ?

 

आयुष्याच सार कशात आहे?

सर्व सामान्य लोक जन्मतात, वयाने वाढतात आणि वाट्याला आलेले आयुष्य जगतात आणि शेवटी मरतात. बर्‍याच जणांच्या नशिबी आला दिवस कसाबसा ढकलायचा एवढेच असते. आयुष्याचे सार वगैरे त्यांच्या कल्पने पलिकडचे काहीतरी असते. आपल्या जीवनाकडे इतक्या गंभीरतेने बघणे एकतर त्यांच्या बुद्धीच्या आवाक्यातलेही नसते किंवा दैनंदिन जीवन संघर्षात त्यांना असल्या विचारांसाठी वेळही नसतो.

कांही थोडे लोक जीवन संघर्षाच्या धामधुमीत भल्याबुर्‍या मार्गाने आपली व कुटुंबाची आर्थिक सामाजिक परिस्थिती सुधारु पहातात व त्यात कमीजास्त यशस्वीही होतात. पण कष्ट,किंवा नशीब किंवा कष्ट+नशीब या समीकरणा पलिकडे जीवनाविषयी व्यापक विचार त्यांच्याकडे नसतो.

थोडक्यात असले गहन व गंभीर प्रश्र्न फक्त बुद्धिवादी, विचारी, व ज्यांना उपजीविके साठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाही असल्या संवेदनशील सजग लोकांनाच हे जीवनाचे कोडे सोडवण्यात रस असतो म्हणून ते काव्यातून,कथा-कादंबर्‍यादि साहित्याच्या वाचन लेखना तून,तत्वज्ञानाच्या व्यासंगातून,धार्मिक-आध्यात्मिक उपासनेतून जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहतात.

यावरुन असे म्हणता येते की जो तो आपापल्या बुद्धीच्या ,कुवतीच्या,परिस्थितीच्या अनुसार आपल्या आयुष्याचा अर्थ काढतो . आयुष्याचा अर्थ किंवा सार सर्वासाठी समान किंवा एकच कधीच असू शकणार नाही. हत्ती आणि सात आंधळे या कथेप्रमाणे ज्याच्या वाट्याला जे व जसे आयुष्य येते त्यातच त्याला त्याच्या आयुष्याचा अर्थ व सार सापडते.

 

कोणत्या गोष्टी आयुष्यात कधीच करू नयेत?

अपल्या जीवनात बऱ्याच लोकांची आपली ताटातूट होते.ते आपले जिवलग नातेवाईक ,मित्र पुन्हा भेटत नाही.तेव्हा जीवनात कधी भांडु नये.किवा लागेल असे बोलू नये .तसे झाले तर माफी मागावी.

आपले जन्म देणारे आई वडील स्वर्गवासि होतात तेव्हा त्यांची किमत कळते.त्याच्याशी कितितरी मुले वाईट वागतात त्यावेळेला त्या जन्मदात्याना दुख होते पण ते दाखवत नाही.त्यांची योग्य काळजी घेतली जात नाही.सगळं तसेच राहुन जाते.जेव्हा चुक उमजते तेव्हा ते आपल्यात नसतात.आयुष्य भराची रुख रुख राहुन जाते.

कितिही श्रीमंती आली तर आता त्याचे कौतुक कोण करनार.म्हणून माणसे तोडू नयेत माणसे जोडावीत.

 

आयुष्यातील कोणत्या छोट्या गोष्टी आपल्याला व्यर्थ ठरवतात?

आपणास नेहमी असे वाटत असते की सभोवतालच्या सर्व गोष्टी या आपल्याबद्दलच वा आपल्याशी निगडित आहेत.

डिपार्टमेंटल स्टोअरमधील कॅशिअर तुम्हाला त्रासिक वाटत होता? 

शक्यता आहे की यापैकी कोणालाही आपल्याविषयी वैयक्तिक राग व आकस नाही. कदाचित कॅशियरचं मूल फ्लूने संपूर्ण रात्रभर झोपलं नसेल. कदाचित आपला पती ऑफिसमधल्या महत्वाच्या कामात गुंतून गेला असेल. कदाचित आपला मित्र रहदारीमध्ये अडकला असेल.

आपण जर या प्रत्येकाचं वागणे हे आपल्याशीच निगडित आहे असं गृहीत धरलंत तर लक्षात असुद्या, तुम्ही स्वतःहून आपलं जीवन कठीण करत आहात! त्याऐवजी, असे गृहीत धरावे की इतरांच्या क्रिया या त्यांच्या खासगी धडपडी, पक्षपातीपणा किंवा वेदना याचा परिपाकही असू शकतात. तरच आपण आनंदी व्हाल, कमी निराश व्हाल आणि कमीतकमी वेळा रागवाल.

 

आयुष्यात कोणत्या गोष्टी महत्वाच्या नसतात?

आयुष्यात महत्वाच्या नसणाऱ्या गोष्टी अस्तित्वातच नाहीये.

प्रत्येक गोष्टीला महत्व आहेच. पण त्यासोबतच प्रत्येक गोष्टीच्या महत्वाची एक सीमा पण आहे.

अन त्या सीमेपलीकडे महत्व दिलेल्या गोष्टी उपयोगाच्या नसतात.

निसर्ग निर्मित सर्व गोष्टी उपयोगी आहेतच फक्त त्या आपल्याला असतील किंवा नसतील,

आपल्याला जेवढे महत्व असेल तेवढेच त्या गोष्टीचे महत्व दुसर्याला असेल अस नसत.

खर तर स्वताला ओळखून स्वताच्या सीमा, आदर्श, बांधून घ्यावा व स्वतःचीच अद्ययावत आवृत्ती जोपासण्याचा प्रयत्न करावा.

दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार आपली प्रतिकृती बनवण्यापेक्षा आपलीच सुधारित आवृत्ती बनवने कधीही चांगल.

त्यामुळे तुम्हाच्या आयुष्यातील महत्वाच्या नसणाऱ्या गोष्टी ओळखा अन त्यांना सुधारवा दुसऱ्याच्या महत्वाच्या नसणाऱ्या गोष्टी तुमच्या महत्वाच्या असू शकतात.

एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर ठिकाण एक असू शकत पण परिस्थिती, वेळ अन मार्ग वेगळे असू शकतात.

 

Read Article : ऑनलाईन शॉपिंग मध्ये जास्तीत जास्त मिळविण्याच्या टीपा

 

जीवनात काहीतरी भारी करायचे आहे, काय करावे?

हा प्रश्न दुसर्यांना विचारुन तुम्हाला नाही कळणार कि, स्वतःला काय भारी करायचय . प्रत्येकाची भारी करायचय ,या गोष्टीची व्याख्या वेगळी असते.

काही लोकांना जगतील सर्व प्रकारच्या हुक्का अनुभवायचा असतो. ते केलं म्हणजे आपण कही भारी केलं याच सार्थक होईल . 

 

आयुष्य कसे जगावे

  1. अवयवदान (Organ Donation) : आपल्या या निर्णयाने नक्कीच आपल्यापेक्षा जास्त दुसर्या कुणाला आयुष्यभर भारी वाटेल. आपण नसलो तरीही आपण कायम कुणासाठी भारी असु .
  2. स्वतःच्या आयुष्यातील महत्वाच्या लोकांना त्यांच्या वाईट काळात मदत करा .दरवेळी आर्थीक मदतच करावी अशी अपेक्षा नसते .तुम्ही फक्त त्यांना समजुन घेतलं तरी त्यांच्यासाठी ते भारी असेल . एका डिप्रेशन मधे असणार्या मित्राला बरोबर वळणावर आणलत तरी देखील ती भारीच गोष्ट ठरेल . अशे कित्येक व्यक्ती आहेत ज्यांना समजुन घेणारं कुणी मिळत नाही व ते आयुष्य संपवतात .
  3. आपल्या मुला/मुलींना योग्या ते संस्कार लावणं व चांगल्या गोष्टी शिकवणं याला कमी भारी काम समजु नका . विनाकारण कुणाचा छळ करु नये,कुणाशी खोटं वागुन त्यांचा माणुसकीवरचा विश्वास उडवु नये अशा गोष्टी जरी रूजवु शकलात तरी ती खुप महत्वाची गोष्ट ठरेल त्यांच्या भविष्यासाठी (आईवडीलांच्या या कामाला आपण नेहमीच कमी लेखतो)
  4. स्वतःच्या आयुष्यात स्वतःला जे करु वाटतं ते सगळं करा(फक्त या गोष्टिंचा त्रास समाजाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना होणार नाही हि काळजी घ्या) . प्रत्येक क्षण भारी जगलात की आपोआप शेवटी मागे वळुन पाहिल्यावर समजेल की खुप भारी काही केलय .
  5. कुठल्या एकाच निराधार व्यक्तीला आधार दिलात तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमच्यापेक्षा भारी नक्कीच कुणी नसेल .जमेल तसं मदत करा शिक्षणात,नोकरीत परीवारातील अडचणीत . कसाही छोटा आधार दिलात तर त्यांना अजुन पुढे जायला मदत होईल.
  6. आपल्याकडुन समाजात काही चुकीचा संदेश जाईल असं वागु नका . तुमच्या नकळत तुमच्यापेक्षा वयाने लहान आजुबाजुचे तुमचं अनुकरण करत असतात मग ते रस्त्यावर थुंकणे,कचरा टाकणे असो किंवा उदाहरण-. समजा तुम्ही कुठल्या स्त्री ,पुरुषाच्या भांडणात स्वतः घुसुन काही माहित नसताना स्त्रीची बाजु घेतली तर तुमच्या सोबतच्या लहान मुलीला वाटणार, अरे स्त्री नेहमी बरोबरच असते ,तीला चुक म्हणतच नाही कुणीच म्हणजे आपण भविष्यात काहीही चुक वागलो तरी आपल्यावर कुणीच बोट उचलणार नाही.

 


 

For suggestions or queries: Contact us at  info@msakshar.in

Subscribe to our Newsletter Click Here

Follow us at, Facebook | Instagram 

 

Web Search: things in life, make you feel worthless , enjoy the little things, feeling lost in life, life is boring, life is like a camera, quotes about enjoying the moment, important things in life, it’s the little things in life, most important things in life

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *