msakshar-article-what-is-health-featured-image

आरोग्य म्हणजे काय? (What is health?)

आरोग्य (Good Health)

चांगले आरोग्य म्हणजे ताणतणाव व स्ट्रेस हॅण्डल करणे आणि दीर्घ, सक्रिय जीवन जगणे. या लेखात चांगल्या आरोग्याचा अर्थ आणि प्रकार स्पष्ट केला आहे.

आरोग्य म्हणजे काय?

msakshar-article-what-is-health-image-1

आरोग्य हे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पणे चांगली अवस्था असणे आहे आणि केवळ रोग किंवा अशक्तपणाची अनुपस्थिती नाही.

याचा अर्थ असा होतो की आरोग्य हे केवळ स्वतः पुरते नाही समाजातील प्रत्येक कार्याला हातभार लावणारे संसाधन आहे. निरोगी जीवनशैली परिपूर्ण, दीर्घ आणि आनंदी जीवन प्रदान करते.

आरोग्याचे प्रकार

शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे दोन प्रकार आहेत जे बहुधा चर्चेत आहेत.

शारीरिक आरोग्य

ज्याचे शारीरिक आरोग्य चांगले असते, त्याच्या शरीराची सर्व कार्ये योग्यरित्या होत असतात. 

शारीरिक आरोग्यामध्ये निरोगी जीवनशैली आणि रोगांचा धोका कमी असणे समाविष्ट आहे. उदाहरणार्थ – शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या श्वासोच्छवासाची आणि हृदयाची कार्यक्षमता, स्नायूंच्या ताकदीची लवचिकता आणि शरीराची रचना त्याच्या सहनशक्तीचे संरक्षण आणि विकास करत असते.

चांगले आरोग्य सहनशक्ती वाढविण्यात आणि रोग कमी करण्यात मदत करते. आणि आपल्या शरीराची कार्यप्रणाली मेन्टेन ठेवते.

Read Article : पांडवलेणी – नाशिक मधली एक ऐतिहासिक लेणीं 

 

मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य माणसाच्या जीवनाची गुणवत्ता सुधरवते. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे असते कारण संपूर्ण सक्रिय जीवनाचा भाग म्हणून दोघांचाही एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे.

उदाहरणार्थ – दीर्घकालीन आजारामुळे एखाद्या व्यक्तीचे नियमित कार्य पूर्ण करण्यात ती अक्षम झाली तर त्या व्यक्तीवर त्याचा परिणाम होतो. यामुळे नैराश्य आणि तणाव वाढू शकतो. या भावना आर्थिक समस्या किंवा मोबिलिटीमुळे येऊ शकतात

चांगल्या आरोग्याचे फॅक्टर

चांगल्या आरोग्याचे दोन घटक:

अनुवांशिक घटक आणि पर्यावरण घटक

आपले आरोग्य ही आपली सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. निरोगी व्यक्ती ही आजारापासून मुक्त असते आणि न थकता शारीरिक कामे करू शकते. एखाद्या व्यक्तीची शारीरिक तंदुरुस्ती तिच्या आरोग्य आणि तंदुरुस्तीबद्दल सांगते.हे योग्य पोषण आणि चांगल्या खाण्याच्या सवयीद्वारे प्राप्त केले जाऊ शकते. ताजे व निरोगी अन्न खाल्ल्याने आपण तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकतो. उदा. फळ, मांस खाऊन आपण दररोज व्यायाम करू शकतो. ते आपले स्वास्थ्य आणि सहनशक्तीची पातळी सुधारण्यास मदत करते.

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे

निरोगी आयुष्य जगण्यासाठी काही महत्वाचे घटक:

निरोगी राहणे म्हणजे केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे नसते तर त्यात भावनात्मक, सामाजिक, मानसिक तंदुरुस्ती देखील आवश्यक असते.

एखादे इन्स्ट्रुमेंट वाजवणे, खेळ किंवा वाचन यासारख्या क्रियांमध्ये मेंदूला आवश्यक व्यायाम मिळतो.

दिवसातून दोनदा दात घासणे आणि जेवणापूर्वी हात धुणे यासारख्या निरोगी सवयीं तुम्हाला निरोगी ठेवू शकतात.

 

msakshar-article-what-is-health-image-2

 

फनफॅक्ट

  • हसण्यामुळे रक्त प्रवाह 20% वाढू शकतो.
  • डोळ्यातील मसल्स शरीरात सर्वात जास्त ॲक्टिव असतात, दिवसातून 100,000 पेक्षा जास्त वेळा हालचाल करतात.
  • कॉफी पिल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो.
  • दररोज सफरचंदचा रस पिऊन खराब कोलेस्ट्रॉल कमी केले जाऊ शकते.
  • अँटीऑक्सिडंट चॉकलेटमुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि युवी रेझ नुकसानांपासून संरक्षण होते.
  • नेहमीच सकारात्मक बाजूकडे पाहा: आशावादी असणे आपल्याला अधिक आयुष्य जगण्यास मदत करू शकते.
  • हाडे मजबूत आणि स्वस्थ असण्यासाठी कॅल्शियमइतकेच व्हिटॅमिन डी ही आवश्यक आहे.
  • जर आपण 4 तासांपेक्षा कमी किंवा 10 तासांपेक्षा जास्त झोपत असाल तर आपल्याला कमी वयातच मरण येण्याचा धोका जास्त असतो.
  • 15 मिनिटे हसणे 2 तासांच्या झोपे इतके गुणकारी आहे.

For suggestions or queries: Contact us at  info@msakshar.in

Subscribe to our Newsletter Click Here

Follow us at, Facebook | Instagram 

 

Web Search: good health, healthy fats, best protein powder for weight gain, healthy food to eat, healthy lungs food, food for strong bones and muscles, best brain food, best food for lungs, best protein powders for weight loss, best probiotics for women, best brain supplements, best protein powder for weight loss and muscle gain, best health drink for women

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *