अविवाहित जोडपे लॉजवर सापडल्यास घाबरून जाऊ नये कारण कोणतीही शिक्षा होणार नाही

जाणून घ्या.. अविवाहित जोडपे लॉजवर सापडल्यास तर घाबरून जाऊ नयेत आणि सापडले तरी कोणती शिक्षा होणार नाही. 

 

 

एखाद्या लॉजवर गेल्यावर अचानक पोलिसांनी छापा टाकला तर तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. अगदी अविवाहीत असले तरी सुद्धा. फक्त तुमचे वय १८ पेक्षा जास्त असावे लागेल. कलम २१ नुसार तुम्ही तुमच्या मर्जीनुसार एकत्र राहू शकता किंवा मर्जीनुसार शाररिक संबंध ठेवू शकता, असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे.

पोलिसांना हॉटेल किंवा लॉजवर राहिलेल्या जोडप्याला त्रास देणे अथवा अटक करण्याचा कोणताही अधिकार नाही.  वय १८ पेक्षा जास्त असलेल्या अविवाहित युवक-युवतींना हॉटेलमध्ये राहण्यासाठी अथवा सहमतीने शाररिक संबंध ठेवण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 

 

Read Article : गेल्या पाच वर्षांत भारताचे राजकारण मध्ये काय काय बदल घडले?

 

हॉटेल अथवा लॉजवर पकडल्यानंतर पोलिस त्रास देत असतील अथवा अटक करत असतील तर या कारवाई विरूद्ध, जोडपे घटनेच्या कलम ३२ किंवा थेट कलम २२६ च्या अंतर्गत थेट न्यायालयात जाऊन त्रास देणाऱ्यास अर्ज करू शकतात.

त्रास देणाऱया पोलिस कर्मचाऱयाविरुद्ध पोलिस अधीक्षकांकडेही तक्रार केली जाऊ शकते. याशिवाय पीडित जोडप्याला मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. हॉटेल अविवाहित जोडप्यांना दोघांचे लग्न झाले नाही, कारणास्तव थांबू देत नसेल तर ते मूलभूत अधिकाराचे उल्लंघन समजले जाईल.

अविवाहित जोडप्यांना हॉटेलचे भाडे देऊन आरामात राहण्याचा अधिकार आहे. भारतीय हॉटेल इंडस्ट्रीची सर्वोच्च संस्था हॉटेल असोसिएशन ऑफ इंडिया येथेही अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये न राहण्यापासून रोखण्याचा कोणताही नियम नाही.

 

पोलिस हॉटेल्सवर किंवा लॉजवर छापा का टाकतात ? 

 

 

अविवाहित जोडप्यांना अटक करण्यासाठी किंवा छळ करण्यासाठी पोलिस हॉटेलमध्ये छापा टाकत नाहीत. वेश्याव्यवसाय हा भारतीय नियमानुसार गुन्हा मानला जातो.

अशा वेश्या व्यवसायाविरूद्ध किंवा गुन्हेगाराला लपवण्याच्या शक्यतेवरून पोलिसांना हॉटेलवर छापा टाकावा लागतो. छापा पडल्यानंतर एखादे अविवाहीत जोडप्याने घाबरून जाण्याची गरज नाही. पोलिसांच्या मागणीनुसार अशा जोडप्याला त्यांचे ओळखपत्र दाखवावे लागते. यामुळे हे सिद्ध होतं की दोघेही परस्पर संमतीने हॉटेलमध्ये आले आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या वेश्याव्यवसायात जोडलेले नाहीत.

 


 

For suggestions or queries: Contact us at  info@msakshar.in

Subscribe to our Newsletter Click Here 

Follow us at, Facebook | Instagram | Twitter | LinkedIn

 

Web Search :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *