गच्चीवरची बाग : नैसर्गिक संसाधनांचा वापर
गच्चीवरची बाग : नैसर्गिक संसाधनांचा वापर
घराच्या गच्चीत/ बाल्कनीत बाग-बगीचा फुलवताना बाजारातील तयार खत व माती यांच्यासह, सहजतेने उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक संसाधनांचा जास्तीत जास्त उपयोग करणं गरजेचं आहे. नैसर्गिक संसाधनं म्हणजे ‘किचन वेस्ट’ जसं की हिरवा कचरा, खरकटं अन्न, खरकटं पाणी इत्यादी. तसंच झाडांच्या वाळलेल्या काडय़ा, सुकलेला पालापाचोळा, सुक्या नारळाच्या शेंडय़ा, सुकवलेले उसाचे चिपाट.. देशी गाईचं सुकं किंवा ओलं शेण. हे सारे घटक मातीचं पोषण वाढवतात.
Read Article : भारताच्या गावातील जीवन
याचबरोबर पायवाटेतली रानातली किंवा वडाच्या झाडाखालची काळी तसंच लाल माती घरच्या झाडांसाठी अत्यंत उपयुक्त असते. भाताचं तूस, गवत हेदेखील उत्तम प्रकारच्या खताचा स्रोत आहे. बागेसाठी भरमसाट माती वापरणं किंवा मातीच न वापरणं या दोन टोकांपेक्षा योग्य प्रमाणात माती वापरणं हा पर्याय बागेसाठी सुवर्णमध्य साधणारा आहे.
या नैसर्गिक संसाधनाचा वैज्ञानिक पद्धतीने वापर केल्यास आपल्याला सावकाश पण खात्रीने उत्तम परिणाम दिसून येतात. व ते दीर्घकाळ टिकतात. तसंच वर नमूद केलेले घटक हे घरच्या घरी उत्तम माती बनवण्यासाठीचा प्रवास व प्रयत्न आहे हे लक्षात घेता येईल. अशा घरीच तयार केलेल्या खत व मातीत गांडुळांची उत्तम वाढ होते. तेच बागेसाठी रात्रं-दिवस मेहनत घेत असतात. अगदी थोडय़ा मातीत अर्थात छोटय़ा कुंडीतही फळभाज्याची रोपं छान फळं देतात. अर्थात हा सारा चमत्कार नैसर्गिक संसाधनांचा आहे.
नारळाच्या शेंडय़ा
नारळाच्या शेंडय़ा हा कोकोपिटला उत्तम पर्याय आहे. नारळाच्या शेंडय़ा पाणी धरून ठेवतात. त्यामुळे कुंडी, वाफ्याच्या तळाशी गारवा तयार होतो. त्यात गांडुळंही निवास करतात. नारळाच्या शेंडय़ा तळाशी वापल्यामुळे मातीचे सूक्ष्म कण त्यात अडवले जातात. नारळाच्या शेंडय़ा शक्यतो सुकलेल्याच वापराव्यात. तसेच शेंडय़ा आहेत तशा अखंड स्वरूपातही वापरता येतात. आपल्याकडे वेळ असल्यास त्यास कात्रीने बारीक तुकडे करावेत. या नारळाच्या शेंडय़ाचं कालांतराने उत्तम खत तयार होतं. मात्र नारळाच्या करंवटीपासून शेंडय़ा विलग करून घ्याव्यात. करवंटय़ा / त्यांचे तुकडे अजिबात वापरू नयेत. त्यांच्यामुळे पाणी व खत प्रक्रिया तसेच झाडांच्या मुळांना अटकाव होतो. नारळच्या शेंडय़ांमध्ये पुरेसा ओलावा नियंत्रित केला तर पसरट वाफ्यात किंवा कुंडय़ात मातीविनाही पालेभाज्या फुलवणं शक्य आहे. तसेच नारळाच्या शेंडय़ा या दीर्घकाळ संग्रहित करता येतात. याचे बारीक काप केल्यास ते कुंडीतील वरील भागात पसरून ठेवल्या की म्हणजे कुंडीतील बाष्पीभवन कमी होते. विशेषत: उन्हाळ्यात याचा अधिक फायदा होतो.
For suggestions or queries: Contact us at info@msakshar.in
Subscribe to our Newsletter Click Here
Follow us at, Facebook | Instagram
Web Search: