मराठी चित्रपटांची दमदार वाटचाल
हिंदी सिनेमाच्या तुलनेमध्ये पुणे आणि इतर महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी हिंदी चित्रपटापेक्षा मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा चांगले दिवस आले आहेत, असे दिसू लागले आहे. ऐतिहासिक चित्रपटांचा एकामागे एक सपाटा लागल्यामुळे शिवप्रताप सारख्या चित्रपटाला फारशी गर्दी दिसून आली नाही. मात्र आपडी थापडी आणि तिन्हीसांजा या चित्रपटांना स्त्रियांची खूप मोठ्या प्रमाणावर पसंती दिसून आली. वास्तववादी चित्रपट प्रेक्षकांना जास्त आवडतात आणि त्यासाठी ते गर्दी देखील करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप खरंतर उत्कृष्ट चित्रपट आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर जाहिरात आणि महाराष्ट्रामध्ये अनेक सिनेमागृहात प्रदर्शित करून सुद्धा म्हणावे तसे यश त्याला मिळालेले दिसून येत नाही. तिन्हीसांजा हा चित्रपट स्त्रियांच्या मानसिक समस्येवर आधारित आहे. जगामधल्या प्रत्येक स्त्रीला जी मानसिक समस्या भेडसावत असते, त्यावर आधारित ही कथा आहे. एवढेच नाही तर जागतिक पातळीवर 24 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने बाजी मारली आहे. त्यामुळे कराड, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, अहमदनगर, बदलापूर अशा ठिकाणी स्त्रियांनी या चित्रपटाला प्राधान्य दिले आहे. चित्रपटातील कलाकार व दिग्दर्शक नविन आहेत. कथा अप्रतिम आहे. आपडी थापडी हा चित्रपट खूपच हलकाफुलका असला तरी मोठे कलाकार व साधेपणा ही वैशिष्ट्ये असल्याने त्यालाही शहरी भागात मोठे यश मिळाले आहे.
सिनेमा: तिन्हीसांजा
दिग्दर्शक:उल्हास आढाव
कलाकार: मेघा विश्वास, अभिजीत रहाणे, आरती तरडे, अवनी मत्स्ये, मुकेश गायकवाड
छाया: कुमार डोंगरे
संगीत: सलील मोहन
संकलन: मधुकर गवंडी
दर्जा:
सिनेमा : शिवप्रताप गरुडझेप
दिग्दर्शन :कार्तिक राजाराम केंद्रे
कथा, पटकथा, संवाद : अमोल कोल्हे
दर्जा :
सिनेमा: आपडी थापडी
निर्माते: केसी पांडे , रियाजत खान , आनंद करीर , साई नारायण , द्रावीत कौर, विशाल शेट्टी
दिग्दर्शन: आनंद करीर
कथा, पटकथा, संवाद: आनंद करीर, सुनील करीर
कलाकार: श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे, संदीप पाठक, नंदू माधव, खुशी हजारे
गीत: गुरु ठाकूर
संगीत: आनंद भास्कर, हसन, रोहन विनायक
छायांकन: सुमन साहू
संकलन: वैभव परब, शैलेश दरेकर
दर्जा: