जगाचे सात आश्चर्य
जगातील नवीन सात आश्चर्य
प्राचीन जगाच्या सात चमत्कारांपैकी सहा आश्चर्यकारक अस्तित्त्वात नाही हे लक्षात घेता, न्यू 7 वंडर्स नावाच्या कंपनीने आधुनिक जगाचे नवे सात चमत्कार शोधून काढले. कंपनीने जगातील नवीन सात आश्चर्य शोधण्यासाठी सर्वेक्षण आणि मतदान प्रणालीचा वापर केला. या यादीमध्ये सात वेगवेगळ्या साइट्स, स्मारके आणि जगभरातील ठिकाणे समाविष्ट आहेत.
चीनची मोठी भिंत
चीन मध्ये राज्याचे रक्षण करण्यासाठी भिंत बांधण्याची सुरुवात झाली इ.स.पू. ८ व्या शतकात ज्या वेळी कुईयान आणि जाहो राज्यांनी तीर आणि तलवारींच्या आक्रमणांपासून वाचण्यासाठी माती आणि खडे साच्यात बसवून बनवलेल्या विटांनी भिंत तयार केली. इ.स.पू. २२१ व्या वर्षी चीन किन साम्राज्याच्या अंतर्गत आले. या साम्राज्याने सर्व छोट्या छोट्या राज्यांना एकत्र करून अखंड चीनची रचना केली. किन साम्राज्याच्या शासकांनी पूर्वेला बनलेल्या वेगवेगळ्या भिंतींना एक केले आणि ती चीनची उत्तर सीमा बनली. पाचव्या शताब्दीच्या खूप नंतरपर्यंत असंख्य भिंती बांधल्या गेल्या, ज्यांना मिळून चीनची भिंत म्हटले गेले. प्रसिद्ध भिंतींपैकी एक इ.स.पू. २२० – २०६ मध्ये चीन चा प्रथम सम्राट किन शी हुआंग याने बांधून घेतली होती. त्या भिंतीचे आता केवळ काही अवशेषच बाकी आहेत. ही भिंत मिंग वंशाद्वारे बनवलेल्या सध्याच्या भिंतीपासून दूर उत्तरेला होती.
नवीन चीनची खूप मोठी सीमा आक्रमणकर्त्यांसाठी खुली होती म्हणून शासकांनी भिंतीला बाकी सीमांपर्यंत पसरवण्यास सुरुवात केली. या कार्यासाठी अथक परिश्रम आणि साधनांची आवश्यकता होती. भिंत बांधण्यासाठी लागणारी सामग्री सीमेपर्यंत वाहून नेणे हे अतिशय अवघड काम होते म्हणून मजुरांनी स्थानिक साधनांचा वापर करताना पर्वतांच्या जवळचे दगड आणि मैदानांच्या जवळची माती आणि खडे यांची भिंत बांधली. कालांतराने विभिन्न साम्राज्य जशी हान, सुई, उत्तरी यांनी भिंतीची वेळोवेळी डागडुजी केली आणि आवश्यकतेनुसार भिंत विभिन्न दिशांना पसरवली. आज या भिंतीने संपूर्ण विश्वात चीनचे नाव उंच केले आहे आणि युनेस्कोने १९८७ पासून ही भिंत जागतिक वारसा म्हणून घोषित केली आहे.
पेट्रा
पेत्रा जॉर्डनच्या म’आन प्रांतातील एक ऐतिहासिक नागरी आहे जी आपल्या खडकातून कोरलेल्या इमारती आणि पाणी वाहन प्रणालीसाठी प्रसिद्ध आहे. इ.स.पू. सहाव्या शतकात नाबाती लोकांनी या शहराला आपल्या राजधानीच्या स्वरुपात स्थापन केले होते. मानले जाते की या शहराची निर्मिती इ.स.पू. १२०० च्या आसपास सुरु झाली असावी. आधुनिक जगात हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पेत्रा एका “होर” नावाच्या पर्वताच्या उतारावर वसलेले आहे आणि पर्वतांनी वेढलेल्या एका द्रोणात स्थित आहे. हा पर्वत मृत सागरापासून अकाबा च्या खाडीपर्यंत जाणाऱ्या “वादी अरबा” नावाच्या घाटीच्या पूर्व सीमेला आहे. पेत्राला युनेस्कोने विश्वाचा वारसा असल्याचा दर्जा दिलेला आहे. बीबीसीने आपल्या “मृत्युपूर्वी नक्की पहावीत अशी ४० स्थाने” च्या यादीत पेत्राला देखील समाविष्ट केलेले आहे.
ख्रिस्त द रीडीमर
क्राइस्ट द रिडीमर ब्राझिलच्या रियो डी जेनेरो मध्ये स्थापित असलेली ईसा मसीहाची एक प्रतिमा आहे जिला जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी आर्ट डेको स्टेच्यू मानले जाते. ही मूर्ती आपल्या ९.५ मीटर (३१ फूट) आधारसाहित ३९.६ मीटर (१३० फूट) उंच आणि ३० मीटर (९८ फूट) रुंद आहे. तिचे वजन ६३५ टन आहे आणि फोरेस्ट नेशनल पार्क मध्ये कोर्कोवाडो पर्वताच्या शिखरावर स्थित आहे (७०० मीटर – २३०० फूट) जिथून संपूर्ण शहर दिसते. ही जगातील अशा प्रकारच्या सर्वांत उंच मुर्तींपैकी एक आहे. बोलिव्हियाच्या कोचाबम्बा मध्ये असलेली क्राइस्टो डी ला कोनकोर्डियाची मूर्ती याच्यापेक्षा थोडी अधिक उंच आहे. ईसाई धर्माचे एक प्रतीक असलेली ही मूर्ती रियो आणि ब्राझिलची एक वेगळी ओळख बनली आहे. ती मजबूत कॉंक्रीट आणि सोपस्टोन पासून बनली आहे. हिची निर्मिती १९२२ ते १९३१ च्या मध्ये झाली होती.
माचू पिचू
याला नेहमी “इंका लोकांचे हरवलेले शहर” असे देखील म्हटले जाते. माचू पिच्चू इंका साम्राज्याच्या सर्वांत परिचित प्रतीकांपैकी एक आहे. ७ जुलै २००७ ला घोषित झालेल्या जगाच्या सात आश्चर्यांपैकी माचू पिच्चू देखील एक आहे.
इ.स. १४३० च्या आसपास इंका लोकांनी त्याचा वापर आपल्या शासकांचे आधिकारिक स्थळ म्हणून सुरु केला होता,, परंतु त्यानंतर साधारण १०० वर्षांनी, इंका लोकांवर स्पेन वाल्यांनी विजय संपादन केल्यावर या जागेला तसेच सोडून देण्यात आले. स्थानिक लोक या जागेला आधीपासूनच ओळखत होते, परंतु संपूर्ण जगाला या जागेचा परिचय करून देण्याचे श्रेय हीरम बिंघम यांना जाते, ते एक अमेरिकन इतिहासकार होते आणि त्यांनी या जागेचा शोध १९११ मध्ये लावला होता, तेव्हापासून मचू पिच्चू एक महत्वपूर्ण पर्यटन स्थळ बनले आहे.
मचू पिच्चूला १९८१ मध्ये पेरूचे ऐतिहासिक देवालय म्हणून घोषित करण्यात आले आणि १९८३ साली याला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून दर्जा दिला. स्पेनिश लोकांनी इंका लोकांवर विजय प्राप्त केल्यावर देखील या स्थळाला लुटले नव्हते, त्यामुळे एक सांस्कृतिक स्थळ म्हणून या स्थानाचे विशेष महत्व आहे आणि या स्थानाला एक पवित्र स्थान देखील मानले जाते.
चिचेन इत्झा
चीचेन इट्ज़ा किंवा चिचेन इत्जा म्हणजे इट्ज़ाच्या विहिरीच्या पाण्यावर” कोलंबस – पूर्व युगात माया संस्कृतीद्वारे बनवण्यात आलेले एक मोठे शहर होते. चीचेन इट्ज़ा उत्तर शास्त्रीय पासून अंतिम शास्त्रीय मध्ये आणि आरंभिक उत्तर शास्त्रीय काळाच्या आरंभी भागात उत्तरी मायाच्या सखल प्रदेशात प्रमुख केंद्र होते. हे स्थान वास्तू शैलीच्या विविध पैलूंचे दर्शन घडवते, ज्यामध्ये समाविष्ट आहेत “मेक्सीक्नाइजड” म्हणवण्यात येणारी शैली आणि केंद्रीय मेक्सिको मध्ये आढळणाऱ्या शैलीची आठवण करून देणारी तसेच उत्तर भागातील पक माया मध्ये आढळणारी पक शैली. केन्द्रीय मेक्सिकन शैलीच्या उपस्थितीला एकेकाळी प्रत्यक्ष प्रवास किंवा केंद्रीय मेक्सिकोच्या विजयाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ओळखण्यात येत असे, परंतु सर्वांत समकालीन व्याख्या या गैर – माया शैलींच्या उपस्थितीला सांस्कृतिक प्रसाराच्या परिणामांच्या रूपाने पाहतात.
चीचेन इट्ज़ाचे खंडर संघीय संपत्ती आहे आणि त्या स्थळाचे प्रबंधन मेक्सिकोच्या राष्ट्रीय मानव विज्ञान आणि इतिहास संस्थानातर्फे करण्यात येते. २९ मार्च २०१० पर्यंत स्मारकांच्या अंतर्गत येणारी भूमी खाजगी मालकी हक्काची होती, मग तिची युक्टन राज्याद्वारे खरेदी करण्यात आली.
कोलोझियम
कोलोसियम किंवा कोलिसियम इटली देशाच्या रोम शहराच्या मध्यात असलेले रोमन साम्राज्याचे सर्वांत विशाल एलिप्टिकल एम्फीथिएटर आहे. रोमन स्थापत्यशास्त्र आणि अभियांत्रिकीचा हा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो.
अंडाकृती कोलोसियमची क्षमता ५०,००० प्रेक्षकांची होती, जी त्या काळी सामान्य गोष्ट नव्हती. या स्टेडियम मध्ये केवळ मनोरंजनासाठी योद्ध्यांमध्ये खुनी लढाया होत असत. योद्ध्यांना जनावरांशी आणि श्वापदांशी देखील लढावे लागे. ग्लेडियेटर वाघांशी लढत असत. असे अनुमान आहे की या स्टेडियम मधील अशा प्रदर्शनांमध्ये जवळ जवळ ५ लाख पशु आणि १० लाख मनुष्य मारले गेले आहेत. याच्या व्यतिरिक्त पौराणिक कथांवर आधारित नाटकांचे प्रयोग देखील या ठिकाणी होत असत. वर्षातून २ वेळा इथे कार्यक्रमांचे भव्य आयोजन होत असे आणि रोमन निवासी या खेळांना खूप पसंत करत असत. पूर्व मध्य काळात या इमारतीला सार्वजनिक प्रयोगांसाठी बंद करण्यात आले. नंतर त्याचा उपयोग निवास, कार्यशाळा, धार्मिक कार्य, किल्ला आणि तीर्थ स्थळ अशा स्वरुपात होत राहिला.
आज एकविसाव्या शतकात भूकंप आणि दगड चोरी यांच्यामुळे ही इमारत केवळ खंडर स्वरुपात राहिली आहे.
ताजमहाल
ताजमहाल हा भारतातील आग्रा शहरातील एक मकबरा आहे. असे म्हणतात की त्याची निर्मिती मोघल सम्राट शाहजहान याने आपली पत्नी मुमताज महल हिच्या आठवणीत केली होती. ताजमहाल मोघल वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्याची वास्तू शैली फारसी, तुर्की, भारतीय आणि इस्लामी वास्तुकलेचे उत्तम मिश्रण आहे. १९८३ मध्ये ताजमहाल युनेस्को विश्व वारसा स्थळ बनले. त्यासोबतच त्याला विश्वाच्या वारशाची सर्वत्र प्रशंसा होणारी, अत्युत्तम मानवी कृतींपैकी एक मानले गेले. ताजमहाल भारताच्या इस्लामी कलेचे रत्न म्हणून देखील घोषित करण्यात्त आले.
सामान्यतः दिसणाऱ्या संगमरवराच्या फरशांच्या मोठ्या स्तरांनी झाकून बनलेल्या इमारतीन्सारखी न बनून, याचा श्वेत घुमट आणि फारशा देखील आकाराने संगमरवराने झाकलेल्या आहेत. मध्यभागी असलेला मकबरा आपली वास्तू श्रेष्ठता आणि सौंदर्याचा परिचय देते. ताजमहाल इमारत समूहाच्या संरचनेची खास गोष्ट अशी की तो पूर्णतः सममितीय (isometric) आहे. त्याची निर्मिती सन १६४८ च्या दरम्याने पूर्ण झाली होती. उस्ताद अहमद लाहोरी याला या कलाकृतीचे प्रमुख श्रेय जाते.
For suggestions or queries: Contact us at info@msakshar.in
Subscribe to our Newsletter Click Here
Follow us at, Facebook | Instagram
Web Search: