आंतरराष्ट्रीय फॅशन विक मध्ये संदीप युनिव्हर्सिटी सर्वोत्कृष्ठ
त्र्यंबकेश्वर ( प्रतिनिधी )
गोवा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय फॅशन विक मध्ये नाशिक – त्र्यंबक रोड वरील संदीप युनिव्हर्सिटीला आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ठ सादरीकरणाचे पारितोषीक मिळाल्याने नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. या कामगिरीमुळे त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
इंटरनॅशनल फॅशन विक, गोवा यांचे वतीने दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे हा महोत्सव होऊ शकला नव्हता त्यामुळे यावर्षी फॅशन शोची स्पर्धा न घेता फक्त सादरीकरण करण्यात आले. दि. ७, ८ व ९ ऑक्टोबर रोजी हा महोत्सव पंजीम येथे संपन्न झाला. यामध्ये देशातील व आंतरराष्ट्रीय प्रोफेशनल फॅशन डिझायनर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मॉडेल्स तसेच संपुर्ण भारतातील विविध फॅशन महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता.
नाशिक- त्र्यंबकेश्वर रोडवरील महिरावणी स्थित सुप्रसिध्द संदीप युनिव्हर्सिटीने या फॅशन विक मध्ये सहभाग नोंदवला होता. संस्थेचे ओएसडी विवेक निकम आणी डीन डाॅ. विभा कपुर यांचे मार्गदर्शनाखाली प्रोफेसर रुपाली पगारे यांनी ड्रेसेसची डिझाईन आणी निर्मिती केली. प्रोफेसर इंजि. सिध्दार्थ धारणे यांनी संकल्पना, ग्राफीक्स, ध्वनी आणी व्हिज्युअल आर्टस् द्वारे एक्सपिरीअन्स डिझाईन तयार केले. प्रोफेसर प्रिती अहिरराव, प्रोफेसर सोनाली विसपुते यांनी विशेष सहकार्य केले तर स्कुल आॅफ डिझाईन तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी कोमल दरगुडे, कोमलेश्वरी देसले, कल्याणी देसले, गौरी सोनार, साक्षी पाटील, सेजल चौधरी, वैष्णवी वाघ, अप्सरा पानीकर आदींनी रॅम्पवर उत्कृष्ठ सादरीकरण केले.
बेटी बचाव संकल्पना व सादरीकरण ऊपस्थितांना प्रचंड आवडली. मोहंजोदडो कालखंडापासुन ते महिला क्रिकेट संघाची प्रतिनिधी मिताली राज पर्यंत कतृर्त्ववान स्त्रियांच्या कतृर्त्वाला उजाळा देण्यात आला. त्या त्या काळानुरुप वेशभुषा करण्यात आली. या सादरीकरणास आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ठ सादरीकरणाचा बहुमान मिळाला. आंतरराष्ट्रीय फॅशन विकचे संचालक मायकल यांचे हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन संस्थेचा गौरव करण्यात आला. या सुयशाबद्दल संस्थेचे चेअरमन संदिप झा, व्हाईस चान्सलर राजेंद्र सिन्हा, रजिस्ट्रार डाॅ. अनिल माहेश्वरी, ओएसडी विवेक निकम, प्रमोद करोले आदींनी टिमवर अभिनंदनाचा वर्षाव केला. संदीप युनिव्हर्सिटीच्या टिमने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मॉडेल्स सोबत या शो मध्ये रॅम्पवॉक केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ठ सादरीकरणाचे पारितोषीक मिळाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे .
Picture courtesy IIFT
Special thanks to Mr Ratnadeep Lal (renowned Fashion Designer and Chairman IIFT) @ratnadeeplal