माहिती तंत्रज्ञान धोरण- माहिती तंत्रज्ञान स्रोतांचा वापर (Information Technology)

माहिती तंत्रज्ञान धोरण – माहिती तंत्रज्ञान स्रोतांचा वापर (Information Technology)

सरकारतर्फे आपल्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढविण्याच्यादृष्टीने काही माहिती व तंत्रज्ञान स्रोत उपलब्ध करुन दिले जातात. या स्रोतांमार्फत कामासंबंधीची माहिती मिळविणे व त्यावर प्रक्रिया करण्यास मदत मिळते. त्याशिवाय, हे स्रोत शासकीय अधिकाऱ्यांना आजूबाजूच्या जगाची माहिती मिळविण्यास तसेच प्रभावी व कार्यक्षम पद्धतीने कार्य करण्यास उपयुक्त ठरतात.

कार्यालयीन कामकाज आणि व्यवसायासाठी संगणक, ई-मेल, इंटरनेट आणि सॉफ्टवेअर वापरणाऱ्या प्रत्येक संस्थेचे माहिती तंत्रज्ञान(आयटी) धोरण असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना संस्थेने उपलब्ध करुन दिलेल्या तंत्रज्ञानाच्या वापराची अपेक्षित पद्धत माहित असणे गरजेचे आहे. कोणत्याही संस्थेसाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून खासगी इंटरनेट आणि ई-मेलचा वापर, सोशल नेटवर्कींग माध्यमे, सुरक्षा, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इत्यादी बाबींवर नियंत्रणाचे धोरण ठरवण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची असते.

माहिती तंत्रज्ञान स्रोतांच्या गैरवापरासंदर्भात एखादी समस्या उद्भवल्यास पुणे महानगरपालिकेतर्फे लिखित स्वरुपातील धोरणांचा मार्गदर्शक तत्वे म्हणून संदर्भ घेतला जातो. त्याशिवाय, इतर कोणत्याही स्वरुपात मार्गदर्शक तत्वे उपलब्ध नाहीत. माहिती तंत्रज्ञान धोरण अस्तित्वात असल्यास कार्यालयीन कामकाजात तंत्रज्ञानाचा अपेक्षित वापर, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि कार्यालयीन माहितीची सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान मार्गदर्शक तत्वांचे पालन आणि युजर्सना पुरविण्यात येणाऱ्या हेल्पडेस्क सेवा या सर्व बाबींमध्ये एकसमानता राखण्यास मदत होते.

पुणे महानगरपालिकेने माहिती व तंत्रज्ञान स्रोतांच्या वापरासंदर्भातील धोरण तयार करताना मोठ्या संस्थांमधील कार्यपद्धतीचा अभ्यास केला आहे. मात्र, यावेळी शासकीय विभागातील कामकाजाचे स्वरुप लक्षात घेण्यात आले आहे.

माहिती तंत्रज्ञान स्रोतांमध्ये डेस्कटॉप सेवा, पोर्टेबल आणि मोबाईल उपकरणे, वायरलेस नेटवर्क, इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह सर्व नेटवर्क्स, एक्सर्टनल स्टोरेज डिव्हाईसेस आणि प्रिंटर, स्कॅनर्ससारखी उपकरणे आणि संबंधित सॉफ्टवेअर्सचा समावेश होतो.

पुणे महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी, विक्रेते, पुरवठादार, कंत्राटदार आणि युजर्स, ज्यांना माहिती तंत्रज्ञानाचे स्रोत पुरविण्यात आले आहेत, अशा सर्वांना माहिती तंत्रज्ञान धोरणांचे पालन करणे बंधनकारक आहे.

व्याप्ती :

वापरकर्त्याच्या दृष्टीकोनातून माहिती तंत्रज्ञान स्रोतांचा वापर नियंत्रित करण्यासाठी या धोरणाचा उपयोग होतो. हे धोरण पुणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी तसेच महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान स्रोतांचा वापर करणाऱ्या इतर पुरवठादार, कंत्राटदार आणि विक्रेत्यांसाठी लागू आहे.

उद्दिष्टे :

  • सर्व घटकांना शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान स्रोत सहज उपलब्ध व्हावेत, त्यांचा योग्य पद्धतीने वापर करता यावा तसेच त्याचा गैरवापर होऊ नये हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या स्रोतांचा वापर करणाऱ्या युजरला हे धोरण मान्य आहे असा त्याचा अर्थ होतो.

 

डेटा सेंटर अँड डिसास्टर रिकव्हरी

भविष्यातील गरजांची पुर्तता करण्यासाठी सध्या अस्तित्वात असणाऱ्या सर्व्हर्स आणि स्टोरेजचे प्रमाण वाढविणे

माहिती व तंत्रज्ञानाशीनिगडीत भविष्यातील गरजा ओळखून त्याप्रमाणे पुर्तता करणे

पायाभूत सुविधांचे एकत्रीकरण आणि सुधारणा

डीआर आणि बीसीपी अंमलबजावणी आराखडा तयार करणे

डीसी आणि डीआरमधील पायाभूत सुविधांना आवश्यक आधार देणे

 

क्लायंट इन्फ्रास्ट्रक्चर

  • डेस्कटॉप, प्रिंटर, स्कॅनर्ससाठी अद्ययावत कॉन्फिग्युरेशन पुरविणे
  • माहिती तंत्रज्ञान पायाभूत सुविधांची खरेदी, किमान तीन वर्षांच्या देखभालीच्या सुविधा पुरविणे
  • सध्या अस्तित्वात असणाऱ्या क्लाएंट इन्फ्रास्ट्रक्चरची देखभाल करणे

 

क्लायंट एसेट मॅनेजमेंट

  • संकेतस्थळावरील गर्दी वाढल्यास बँडविड्थची तरतूद करणे
  • एमपीएलएस किंवा ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीची फिसिबिलीटी तपासणे
  • कार्यालयामध्ये योग्य लॅन सेटअप आहे याची खात्री करणे
  • भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी ●नेटवर्क प्लॅनिंग हाती घेणे

 

नेटवर्क कनेक्टिव्हिटी

जुने सर्व्हर्स आणि ऑपरेटिंग सिस्टम्स काढून टाकणे

आवश्यक डेटाबेस आणि ऑपरेटिंग सिस्टम्सचा परवाना विकत घेणे

सॉफ्टवेअर लायसन्स मॅनेजमेंट

आयटी धोरणे

पासवर्ड धोरण – संगणकाच्या सुरक्षिततेसाठी पासवर्ड अत्यंत आवश्यक असतात. सर्व एप्लिकेशन्स, उपकरणे, सुरक्षा उपकरणे, लॅपटॉप्स आणि डेस्कटॉप्सचा वापर योग्य कारणांसाठी व्हावा यादृष्टीने पहिल्यांदा या उपकरणांना पासवर्डची सुरक्षा उपयुक्त ठरते. चांगला पासवर्ड नसल्यास पुणे महानगरपालिकेच्या नेटवर्कला धोका संभवतो. पुणे महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान स्रोतांशीनिगडीत सर्व घटकांची या नेटवर्कच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. सर्व व्यक्तींनी खाली सांगितल्याप्रमाणे पासवर्डची निवड आणि सुरक्षेची काळजी घ्यावी.

 

 

ई-मेल धोरण – एंटरप्राईज ई-मेल यंत्रणा संस्थांना दररोजची आवश्यक व्यावसायिक कामे पार पाडण्यासाठी देण्यात आलेली अत्यंत महत्त्वाची सुविधा आहे. स्पॅम, व्हायरससारख्या धोक्यांपासून पुरेशी सुरक्षा न मिळाल्यास यंत्रणेची कामगिरी ढासळून संपुर्ण यंत्रणा कोसळू शकते. तसेच कर्मचाऱ्यांनी ई-मेलचा निष्काळजी वापर केल्यास संस्थेबाबतची माहिती बाहेर जाऊ शकते आणि संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का पोचू शकतो.

लॅपटॉप सिक्युरिटी पॉलिसी

 

इंटरनेट वापराचे धोरण – कोणत्याही संस्थेतील माहिती तंत्रज्ञान यंत्रणा चालविणाऱ्या उपकरणांबाबत अंतर्गत आणि बाह्य नेटवर्कमार्फत उद्भवणाऱ्या धोक्यांपासून सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. इंटरनेट वापरावर नियंत्रण नसल्यास यंत्रणांना व्हायरस, वॉर्म्स, मालवेअरचा धोका संभवतो. या धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट पुणे महानगरपालिकेच्या नेटवर्कचा अंतर्गत स्तरावर तसेच बाहेरुन सुरक्षितदृष्ट्या वापर सुनिश्चित करणे, महत्त्वाच्या आयटी मालमत्तांसाठी वेळोवेळी सुविधा पुरविणे आणि सध्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांचे सुयोग्य व्यवस्थापन हे आहे.

 

सिक्युरिटी लॉग अँड इव्हेंट मॅनेजमेंट – सुविधा व्यवस्थापन सेवांमध्ये सिक्युरिटी लॉग/इव्हेंट मॅनेजमेंटचा समावेश करणे हे या धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुणे महानगरपालिकेत प्रसंगानुरुप व्यवस्थापन, सुरक्षा इशारा नियंत्रण आणि क्षमतेसंदर्भातील अनुपालन वाढविण्याच्यादृष्टीने या धोरणाची अंमलबजावणी आवश्यक आहे.

 

अँटीव्हायरस धोरण – संस्थेतील सर्व डेस्कटॉप्स, लॅपटॉप्स, सर्व्हर्स आणि नेटवर्क एक्सेस पॉईंट्सची सुरक्षा अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अँटीव्हायरस सोल्युशन्सचा उपयोग केला जातो. या सोल्युशन्सद्वारे यंत्रणेला असलेला धोका लवकरात लवकर ओळखणे, त्याला कार्यक्षम पद्धतीने प्रतिबंध करणे आणि धोकादायक कोड नष्ट होणे आवश्यक आहे.

 

बदल व्यवस्थापन – माहिती तंत्रज्ञान मालमत्तांमध्ये अनधिकृत किंवा अप्रमाणित पद्धतीने बदल केल्यास यंत्रणेच्या सुरळित कार्यपद्धतीत खंड पडू शकतो तसेच युजर्सना मिळणाऱ्या सेवांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. या मालमत्तेत कोणताही लहान मोठा बदल करण्यापुर्वी त्याचे योग्य रीतीने विश्लेषण व्हायला हवे. तसेच बदलाच्या अंमलबजावणीपुर्वी योग्य परवानगी घेणे, सर्व प्रक्रियेची लिखित स्वरुपात नोंद करुन ठेवणे आणि बदलाची देखरेख करणे आवश्यक आहे. संस्थेतील माहिती तंत्रज्ञान मालमत्तांमध्ये होणाऱ्या बदलांचे प्रभावी व्यवस्थापन हा या धोरणाचा उद्देश आहे.

 


 

For suggestions or queries: Contact us at  info@msakshar.in

Subscribe to our Newsletter Click Here

Follow us at, Facebook | Instagram 

 

Web Search: 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *