TVF Aspirants’ सीरीज वादाच्या भोवऱ्यात, प्रसिद्ध लेखकाने केला मोठा आरोप
TVF Aspirants’ सीरीज वादाच्या भोवऱ्यात, प्रसिद्ध लेखकाने केला मोठा आरोप
अलीकडे प्रदर्शित झालेली ‘TVF Aspirants’ प्रेक्षकांमध्ये आणि चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. चाहत्यांमध्ये ही सीरीज अधिकाधिक पसंत केली जात आहे. ही सीरीज सामान्य जीवनाशी संबंधित असल्याने तरूणांना खूप आवडली आहे. रिलीज झाल्यापासून ही लोकांची वाहवा मिळवत आहे. लोकांच्या मनात घर केलेल्या या सीरीजबाबत आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे
एकीकडे ही सिरीज दणक्यात सुरू असताना दुसरीकडे लोकप्रिय हिंदी लेखक निलोत्पाल मृणाल यांनी TVF Aspirants या सीरीजवर चोरीचा आरोप लावला आहे. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.
TVF Aspirants ची कथा चोरीची?
निलोत्पाल मृणाल म्हणतात की, या सीरीजमध्ये त्यांची कथा वापरली गेली आहे. यानंतर टीव्हीएफच्या Aspirants विरोधातला वापरकर्त्यांचा रोष आता सोशल मीडियावर उमटला आहे. वापरकर्त्यांनी देखील आता असे म्हटले आहे की, त्यांनी मालिकेचे श्रेय लेखकाला दिलेच पाहिजे.
Read Article : ७ भारतीय वेब मालिका परदेशी शोमधून रुपांतरित झाली
डीएनएच्या वृत्तानुसार, लेखक नीलोत्पल मृणाल यांनी हिंदीमध्ये प्रदीर्घ फेसबुक पोस्ट लिहित असा दावा केला आहे की, टीव्हीएफची नवीन वेब सीरीज ‘Aspirants’ ही त्यांच्या 2015मध्ये प्रकाशित झालेल्या ‘डार्क हॉर्स’ या पुस्तकावर आधारित आहे. अरुणाभ कुमार निर्मित ही वेब सीरीज दिल्लीतील ‘राजिंदर’ नगरमध्ये राहणाऱ्या यूपीएससीच्या उमेदवारांच्या जीवनावर आधारित आहे.
सीरीजच्या दिग्दर्शकावर प्रश्न चिन्ह!
इतकेच नाही तर, आपल्या पोस्टमध्ये नीलोत्पाल यांनी टीव्हीएफचे अरुणाभ कुमार यांना ते कसे भेटले, हे देखील सांगितले आणि त्यांच्या “डार्क हॉर्स” या पुस्तकावर आधारीत वेब सीरीजचा चित्रपट बनवण्याची कल्पना देखील दिली. त्यांनी ही बैठकही चांगली झाल्याचे लिहिले. इतकेच नाही, तर निलोत्पाल पुढे म्हणतात की, सैद्धांतिकदृष्ट्या Aspirantsची 30% कथा त्यांच्या पुस्तकावर आधारित आहे, पण मुंबईत बसलेल्या लोकांसाठी हा चिंतेच विषय नव्हता.
लेखक नीलोत्पल मृणाल यांना ‘डार्क हॉर्स’ या कादंबरीसाठी 2016चा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, आता तो टीव्हीएफविरूद्ध कायदेशीर कारवाई करू शकेल, असे म्हटले जात. लेखकाने स्वतः ही सीरीज पाहिली आहे, जेव्हा त्याने ती पाहिली, तेव्हा या गोष्टी त्याच्या लक्षात आल्या होत्या.
For suggestions or queries: Contact us at info@msakshar.in
Subscribe to our Newsletter Click Here
Follow us at, Facebook | Instagram | Twitter
Web Search: