वाढती गुन्हेगारी कशी रोखणार..?

गुन्ह्याची संकल्पना

सामाजिक आणि नैतिक मूल्ये बदलत असतात. त्यामुळे गुन्ह्याची संकल्पना व प्रकार बदलत राहतात. उदा., वैवाहिक-नीतिमत्तेच्या कल्पना बदलल्या, त्याप्रमाणे गुन्हे बदलतात. पूर्वी बहुपत्नीत्व गुन्हा नव्हता; पण तो आज गुन्हा होऊ शकतो. बहुपतित्व पूर्वी काही समाजांत गुन्हा नव्हता; पण तो आज गुन्हा होऊ शकतो. मालमत्ता अथवा योग्य वस्तूंच्या साठ्यावर पूर्वी नियंत्रण नसायचे. त्या वेळी जे कृत्य निर्दोष, तेच कृत्य नियंत्रण आल्यामुळे गुन्हा ठरवले जाऊ शकते. सारांश, विशिष्ट काळी कायद्याने जे कर्म वा अकर्म सदोष व दंडार्ह ठरविले असेल, ते कर्म किंवा अकर्म त्या काळी गुन्हा ठरते. पाप, व्यसन व गुन्हा या तीन भिन्न संकल्पना आहेत. नैतिक दृष्ट्या पाप म्हणजे गुन्हा हे समीकरण बरोबर नाही.

केलेला उपकार न स्मरणे नैतिक दृष्ट्या पाप असेल; पण तो गुन्हा नव्हे. खोटे बोलण्याची सवय हे पाप असेल; पण गुन्हा नव्हे. दारू पिणे जेथे कायद्याने मना नाही, तेथे दारूबाज हा व्यसनी आहे, पण गुन्हेगार नव्हे. कायदा वा तत्सम सामाजिक संकेत असल्याशिवाय गुन्ह्याची संकल्पना संभवत नाही. ‘जिकडे कायदा नाही तिकडे गुन्हा नाही’, अशी रोमन समाजात एक म्हण प्रचलित होती, ती या दृष्टीने अर्थपूर्ण आहे.msakshar-article-how-to-stop-rising-crime-image-1

गुन्हे शास्त्राची व्याप्ती

समाज व व्यक्ती यांमध्ये संघर्षशून्य समन्वय राहिल्याशिवाय गुन्हेगारी नष्ट होणार नाही. विसाव्या शतका पर्यंत, गुन्हा केल्याच्या आरोपावरून त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात येत असे, अशांचाच अभ्यास गुन्हे शास्त्रात होत असे. अलीकडे गुन्हे शास्त्राचा अभ्यास विषय व्यापक होत चालला आहे. गुन्हेगार आणि त्याच्याबद्दलचे शासनाचे व न्यायासनाचे कार्य व त्या संबंधित संस्था एवढ्यांचाच अभ्यास गुन्हे शास्त्रात अभिप्रेत नाही. गुन्हा का व कसा घडला, गुन्हेगाराने कोणत्या परिस्थितीत गुन्हा केला, गुन्हा करण्यामागील त्याचा हेतू कोणता होता, त्याच्या गुन्हेगारीमुळे इतरांवर आणि एकूण समाजावर विपरीत परिणाम कोणते झाले इ. प्रश्नांचा ऊहापोह गुन्हे शास्त्रात केला जातो. वर्तमान समाज औद्योगिकीकरण व शहरीकरण यामुळे जटिल झाला आहे. गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. समाजातील वातावरण गुंतागुंतीचा होत असल्याने व मोठमोठ्या शहरांमधील छोट्या समूहांची प्राथमिक नियंत्रणाची भूमिका गौण होत चालल्याने व्यक्तीच्या गुन्हेगारी वर्तनावर दडपण राहत नाही. परिणामतः शहरात गुन्हेगारी व प्रामुख्याने बालगुन्हेगारी वाढत आहे. सामाजिक जीवनातील गुंतागुंत, धावपळ, विस्कळीतपणा, अनामिकता या कारणांमुळे गुन्हेगारी बळावते आणि गुन्हेगारीमुळे सामाजिक जीवनात अस्थिरता व असुरक्षितता येते. जेथे शासनामध्ये शिथिलता आणि भोंगळपणा येतो, तेथे गुन्ह्याची दखल वेळीच व कार्यक्षमतेने घेतली जात नाही. गुन्हेगारांना जेथे सुरक्षितता वाटते, तेथे सामान्यांना भय वाटू लागते.

गुन्हेशास्त्रात गुन्हा, गुन्हेगार व गुन्हेगारी या तिन्हींचा सखोल अभ्यास केला जातो. गुन्हे शास्त्र इतकेच दंडशास्त्र महत्त्वाचे आहे. गुन्हा करणाऱ्याच्या हातून समाजावर अन्याय झालेला असतो. अन्यायाचे परिमार्जन शिक्षकांमार्फत व्हावे, अशी अपेक्षा समाजाची व गुन्हेगाराच्या दुष्कृत्याला नाहक बळी पडलेल्यांची असते. शिक्षा म्हणजे पापक्षालन, शिक्षा म्हणजे गुन्ह्याच्या दुष्कृत्यांचा बदला, शिक्षा म्हणजे निरपराध्यांना दहशत, शिक्षा म्हणजे चुकलेल्याला सुधारणे, शिक्षा म्हणजे गुन्हेगाराला सामाजिक रोगी समजून उपचार करणे इ. विविध दृष्टीकोनातून शिक्षण पद्धतीचा अवलंब झाला. यांपैकी कित्येक पद्धती आजही प्रचलित आहेत. गुन्हेगारांना शिक्षा भोगलेल्या समाजावर काय परिणाम झाला आणि शिक्षेनंतर गुन्हेगाराचे समाजात काय होते याची दखल दंडशास्त्र घेतली पाहिजे, असा आधुनिक विचार पुढे येत आहे. गुन्हेगारीकडे व गुन्हेगार कडे पाहण्याचा दृष्टीकोण व व्यवस्था सतत बदलत आहेत. त्या अनुषंगाने या दोन्ही शास्त्रांच्या अभ्यासाला वर्तमान समाजात महत्त्वाचे स्थान प्राप्त होत आहे.

गुन्हेगारीबाबतचे समाजशास्त्रीय स्पष्टीकरण

गुन्हेगारीचा विचार करता पुढील काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत : गुन्हेगारी उपजत नसून संपादन केलेली वर्तणूक असते. खिसा कसा कापायचा व गुन्हे करूनही निष्पाप पणाचा आव कसा आणावयाचा याचे शिक्षण व त्या दृष्टीने सराव केल्याशिवाय खिसेकापूगिरी करता येणार नाही. माणसा माणसांच्या सहवासात राहून गुन्हा करण्याचे शिक्षण मिळते. घनिष्ट संबंध असलेल्यांच्या मार्फत गुन्ह्याचे शिक्षण घेणे सुलभ जाते. गुन्ह्याचे तंत्र, उद्देश, प्रयोजकता इ. सर्व शिकावे लागते. कायदेभंग, सामाजिक नीतिमूल्य यांच्या विरोधी वर्तन किंवा नियमांचे उल्लंघन करण्यासारखे वातावरण व व्यक्ती यांचा सहवास जितका जास्त, तितका गुन्हा करण्यास प्रोत्साहन मिळण्याचा संभव जास्त असतो.

msakshar-article-how-to-stop-rising-crime-image-2

गुन्हेगारांचे प्रकार व त्यांचे जीवन

गुन्हेगारी जीवन कसे असते, याविषयी खूपसे संशोधन झालेले आहे. गुन्हेगार पहिला गुन्हा केल्यानंतर हळूहळू निर्ढावत जातो. ही क्रिया केव्हा पूर्ण होईल, हे त्याच्या व्यक्तिमत्त्वावर आणि गुन्ह्याच्या प्रकारावर अवलंबून आहे. ज्या गुन्हेगाराने लहानपणीच हिंसात्मक गुन्ह्यांना सुरुवात केली आहे, तो एकोणिसाव्या वर्षी निर्ढावतो. पैशांची अफरातफर करणारा गुन्हेगार पहिल्याने लहान रकमांनी सुरुवात करतो. नंतर त्याचा आत्मविश्वास वाढतो व शेवटी समाजच अन्यायी आहे, असे मानून आपल्या कृत्याचे स्वतःशी समर्थन करतो. पुष्कळ वेळा बेकायदेशीरपणाने पैसे वापरले, तरी आपण ते योग्य वेळी भरून टाकू, अशा खोट्या विश्वासाने गुन्हे घडतात. असे गुन्हेगार आत्मवंचनाच करतात. नंतर ते पैसे फेडण्यासाठी जुगाराकडे वळतात. त्यांपैकी काही तर पुष्कळदा आत्महत्या करतात. गुन्हेगारांमध्ये जोपर्यंत स्वतःची सुधारणा करण्याची सुप्त इच्छा असते, तोपर्यंत जर त्याची सुधारणा झाली, तर तो चांगल्या मार्गाला लागू शकतो. गुन्हेगारास पकडल्यावर, तो तुरुंगात असताना अथवा सुटून आल्यावर त्याच्याकडे पाहण्याचा समाजाचा विशिष्ट दृष्टीकोण असतो. काही अंशी अशी व्यक्ती तिरस्कृत अथवा बहिष्कृत असते. त्यामुळे गुन्हेगाराचे पुनर्वसन होणे कठीण बनते.गुन्हेगारांचे स्वतःचे असे एक जग असते. इंग्रजीत त्याला ‘अंडरवर्ल्ड’ म्हणतात. या जगात गुन्हेगार परस्परांशी भ्रातृभावाने वागतात.

 

Read Article : लोक का गप्पा मारतात आणि ते कसे टाळावे?

 

विषप्रयोग करून मारणे, खोट्या सह्या करणे, गृहकलह निर्माण करणे याही गुन्ह्यांमध्ये स्त्रिया असतात. गुन्हेगारांमध्येही एक प्रकारचा प्रामाणिकपणा आढळतो. मिळालेल्या वित्ताची योग्य वाटणी करणे व दुसऱ्या कोणाही गुन्हेगाराची पोलिसांनी बातमी न देणे यांसारख्या गोष्टी गुन्हेगार कसोशीने पाळतात. गुन्हेगार कसे वागतात, हे पाहणे उद्‌बोधक असते. गुन्हेगाराच्या वागणुकीत संघभावनेचा प्रभाव असतो. गुन्हेगारांमधील संकेत, संप्रदाय, रूढी, भ्रातृभाव वगैरेंना धरून त्यांची वागणूक असते. विशेषतः एकाच प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांमध्ये एक प्रकारचा जिव्हाळा निर्माण होतो. सर्व प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांमध्ये कायद्याबद्दल अथवा पोलिसांबद्दल द्वेष किंवा तिरस्कार हा सामान्य घटक असतो. दुकानातून वस्तू लंपास करणारे अथवा खिसेकापू लोक तंत्रज्ञ असतात. इतर चोरांकडे ते कनिष्ठ या नात्याने बघतात. गुन्हेगारांच्या सामूहिक जीवनात त्यांची विशिष्ट भाषा आणि संकेत रूढ असतात. हे प्रकार पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेले असतात. धंदेवाईक चोरी हा गुन्हेगारीचा विशिष्ट प्रकार यामुळेच संशोधनाचा विषय झाला आहे.

वाढती गुन्हेगारी कशी रोखणार..?

msakshar-article-how-to-stop-rising-crime-image-3गोवा हे छोटे राज्य. पण या राज्यातील विविध समस्या व प्रश्‍न मात्र बेसुमार वाढत आहेत. त्यावरती उपाययोजना करणे हे सरकारला एक आव्हानच आहे. राज्यातील गुन्हेगारीही दिवसेंदिवस वाढते आहे. खून, घरफोड्या, चोर्‍या, दरोडे, खुनी हल्ले, बलात्कार, अपहरणे यांच्या संख्येत होणारी वाढ ही चिंतेची बाब ठरली आहे.

वाढत्या गुन्हेगारीला अनेक कारणे आहेत. गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलीस यंत्रणेला येणारे अपयश नि विविध स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी आरोपपत्र दाखल झालेल्या आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाकडून होणारी निर्दोष सुटका ही प्रमुख कारणे आहेत. पोलिसयंत्रणा तपासकामात कमी पडते यालाही तशीच कारणे आहेत. पोलिसांना जनतेकडून व सरकारकडूनही हवे तेवढे व हवे तसे सहकार्य मिळत नाही. साक्षीदार म्हणून पुढे येण्यास सहसा कुणी तयार होत नाही.

बलात्कार, हुंडाबळी आदी गुन्ह्यांसाठी कठोर शासन करण्याची कायदेशीर तरतूद हवी. तसा प्रयत्नही झालेला आहे. त्याची कडकपणे कार्यवाही व्हायला हवी. तरच महिलांना समाज जीवनात खरी सुरक्षितता लाभू शकेल. परप्रांतीय लोक रोजगार, व्यवसाय, धंदा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येऊन स्थायिक झाले आहेत. बरेच व्यावसायिक स्वतःची घरे बांधून राहतात. तर भाडेपट्टीवर खोल्या घेऊन राहणे पसंत करणार्‍यांची संख्या अधिक आहे. काही परप्रांतीय कामगार तर उन्हाळ्यात मोल-मजुरी करण्यासाठी गोव्यात येतात नि पावसाळ्यात आपल्या गावी शेती-उद्योग करण्यासाठी निघून जातात. तर असेही बरेच परप्रांतीय आहेत जे पावसाळ्यात गोव्यात येऊन चोर्‍या करून आपली रोजी ऐषारामात चालवितात. ही बाब सर्वश्रूत आहे.

भाडेकरुंची माहिती घरमालकांनी संबंधित जवळच्या पोलिस स्थानाकावर द्यावी अशी सक्ती करूनही घरमालक ही माहिती लपवून ठेवतात. पोलिसांना सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे चोर्‍यांचा तपास लावण्यात पोलिसांना धागेदोरे सहजासहजी सापडत नाहीत. गोमंतकीय घरमालकांची ही वृत्ती बरोबर नाही. राज्यांत शांतता प्रस्थापित व्हावी, कायदा-सुव्यवस्थेला बाधा येणार्‍या घटना, गुन्हेगारी आदी बाबींना आळा बसावा म्हणून जनता-पोलीस-राजकारणी नि सरकार यांच्या वतीने प्रामाणिकपणे सामूहिक प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे.

तरुणाईची पावले गुन्हेगारी जगताकडे वाढत असल्याने चिंता

ऐशोरामी जीवन जगण्याच्या स्वप्नात असलेल्या तरुणाईची पावले दिवसेंदिवस गुन्हेगारी जगताकडे ओढली जात असल्याचे गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे. आतापर्यंत पोलिसांनी विविध गुन्ह्यांत अटक केलेले गुन्हेगारांमध्ये 18 ते 25 वर्षे वयोगटातील मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही बालगुन्हेगार असल्याचेही निष्पन्न झाले आहे. शिक्षण व कामधंद्यांकडे दुर्लक्ष करुन ही तरुणाई गुन्हेगारी जगताकडे का वळत आहे? हे शोधून तरुणाईत प्रबोधन होणे गरजेचे वाटू लागले आहे.

गेल्या काही वर्षांत दुचाकी चोरी, सोनसाखळी चोरी, रस्तालूट, घडफोड्या, खंडणी, मुलींची छेडछाड, अत्याचार, विनयभंग या प्रकारच्या गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली आहे. वाळूतस्करी, गौण खनिजाची तस्करी या गुन्ह्यातही चांगलीच वाढ झालेली आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा एकतरी कमी पडत आहे किंवा गुन्हेगारांचे प्रशासकीय यंत्रणेशी साटेलोटे आहे, असे म्हणावे लागेल. त्यामुळे गुन्हेगार व्हाईट कॉलरने खुलेआम प्रशासकीय यंत्रणेच्या नाकावर टिच्चून गुन्हे करीत आहेत.

त्यामुळे छोटा गुन्हा करणारा गुन्हेगार गुन्हेगारीचे एकावर एक टप्पे पार करीत समाजात स्वतःची दहशत निर्माण करीत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात पोलीस प्रशासनाने अनेक गुन्ह्यांची उकल करीत अनेक गुन्हेगारांना जेरबंद केलेले आहे. यातील बहुतांश गुन्हेगार हे 18 ते 25 वयोगटातील आहेत. तर काही बालगुन्हेगार आहेत. मोठ्या गुन्ह्यातील बालगुन्हेगारांना काही काळ बालसुधारगृहात ठेवून सोडून देण्यात येते तर छोट्या गुन्ह्यातील बालगुन्हेगारांना अटक न करताच समज देऊन सोडून देण्यात येते. त्यामुळेच या बाल गुन्हेगारांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ मिळते तर विविध गुन्ह्यातील आरोपी अटक होऊनही जामिनावर बाहेर येऊन साक्षी पुराव्याअभावी निर्दोष सुटून गुन्हेगारी जगतात आपले स्थान निर्माण करीत आहेत.

 

Read Article : कोव्हीड -१९ भारतातील साथीच्या आजरा दरम्यान डॉक्टर आणि आरोग्यसेवा कामगारांची स्थिती

 

बालगुन्हेगार

विविध देशात किती लहान वयात केलेल्या अपराधांना गुन्हा समजायचे त्याचे वेगवेगळे कायदे आहेत. माणसाचे वय ठरविण्याच्यापा दोन पद्धती आहेत, एक क्रोनॉलॉजिकल आणि दुसरी बायॉलॉजिकल. क्रोनॉलॉजिकल म्हणजे जन्मतारखेपासून मोजायची वर्षे, आणि बायॉलॉजिकल म्हणजे व्यक्तीचे मानसिक वय. मानसिक वय हे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक क्षमतेवर आधारलेले असते. व्यक्ती ज्या परिस्थितीत आहे आणि तिची मानसिक अवस्था कशी आहे यानुसार व्यक्तीत शारीरिक बदल झालेले असतात. त्यामुळे अनेकदा लहान वयाचा माणूस प्रौढ माणसासारखा आणि त्याउलट वयाने मोठा असलेला माणूस लहान मुलासारखा वागत असतो. म्हणून लहान वयात केलेल्या गुन्ह्यासाठी गुन्हेगाराचे शारीरिक वय न घेता त्याचे मानसिक वय विचारात घ्यावे असे जगात अनेक देशांत मानले जाते. गंभीर गुन्ह्यांचा संदर्भात अपराध्याचे मानसिक वयच विचारात घ्यावे असे भारतीय वैद्यक संघटनेचे म्हणणे आहे.

मुले गुन्हेगार का बनतात?

समाजशास्त्रज्ञ‌‌

समाजशास्त्रज्ञ समजतात की वय नाही तर मुलाची वागणूक अपराधाचे कारण असते. गुंडागर्दी करणे, वाईट लोकांची संगत मिळणे, अश्लील भाषेचा प्रयोग करणे, आईबापांचे न मानणे वगैरे गोष्टी मुलाला अपराधी बनवतात. सामाजिकदृष्ट्या शाळेतून पळून घरी येणे हाही अपराध समजला जातो, परंतु कायद्याच्या दृष्टीने हा अपराध नाही.

मानववंशशास्त्रज्ञ‌‌

मानववंशशास्त्रज्ञ आणि शरीर वैज्ञानिक समजतात की अपराधाची प्रवृत्ती ही आनुवंशिक, मुलाच्या शरीररचनेनुसार आणि त्याच्या जातिधर्मावर अवलंबून असते. एकसारखी शारीरिक रचना असलेले लोक एकसारखे अपराध करतात, आणि गुन्हेगार जातींशी संबंध असलेले पिढ्यान्‌‌पिढ्या गुन्हेगार असतात. त्यांच्यामध्ये बहुतेक वेळा एकसारखीच अपराधाची प्रवृत्ती असते.

मानसशास्त्रज्ञ‌‌

मानसशास्त्रज्ञांच्या मते अपराधी प्रवृत्ती वंशावर किंवा शरीररचनेवर अवलंबून नसते. या गोष्टींचे भावना आणि आकांक्षा यांच्याशी काहीही थेट नाते नसते. मूल ज्या वातावरणात वाढते ते वातावरणही गुन्हेगारी प्रवृत्ती असण्याचे कारण नसते. एकाच परिस्थितीत आणि एकाच कुटुंबात वाढलेले सर्व भाऊ-बहीण गुन्हेगार बनत नाहीत.

बाल-अपराध्यांना गुन्हेगार समजण्याच्या विविध देशांतील पद्धती

अमेरिका

अमेरिकेत साधारणपणे १८ वषे वयाखाली व्यक्तींना किशोर समजले जाते, परंतु किशोरवयातील व्यक्तीने जर एखादा गंभीर अपराध केला असेल, तर त्याचा खटला ज्युव्हेनाईल कोर्टातून मोठ्या वयाच्या गुन्हेगारांचे खटले चालविणाऱ्या कोर्टात पाठविला जातो. अशा तथाकथित अजाण मुलांना जन्मठेपही होऊ शकते.अमेरिकेत याबाबत विविध राज्यांत वेगवेगळे कायदे आहेत. न्यूयॉर्क, नॉर्थ व साऊथ कॅरोलिना, न्यू हॅम्प‌‌शायर आणि टेक्सास या राज्यांत १७ वर्षाहून कमी वयाच्या मुलांना किशोर समजले जाते, परंतु गंभीर अपराध्यांचा बाबतीत १६ वर्षे वयाच्या मुलालाही मोठ्या वयाच्या गुन्हेगारासारखी शिक्षा सुनावली जाते. केंटुकी प्रांतात तर १४ सालच्या मुलालाही अशा परिस्थितीत मोठ्या वयाच्या गुन्हेगारासारखी सजा दिली जाते.

इंग्लंड

इंग्लंडमध्ये १० ते १८ वर्षे वयाच्या मुलांसाठी ज्युव्हेनाईल कोर्ट आहे, तरीही १० वयापेक्षा मोठ्या वयाच्या मुलाने गंभीर गुन्हा केला तर त्याचा खटला क्राऊन कोर्टात पाठवला जातो. पूर्वी या ठिकाणीही मुलांच्या पुनर्वसनाची तरतूद होती, पण इ‌.स. १९९३मध्ये जेम्स बल्जर नावाच्या मुलाचा १० वयाच्या दोन मुलांनी खून केला, त्यावेळी कायद्यात बदल करण्यात आला, आणि असे खटले ज्युव्हेनाईल कोर्टात चालविणे बंद झालेस्कॉटलंडमध्ये १६वर्षापर्यंतच्या मुलांना किशोर समजले जाते, परंतु १२वर्षे वयाच्या मुलालाही गुन्ह्यासाठी जबाबदार समजले जाते. पूर्वी हे वय ८ वर्षे होते.

ऑस्ट्रेलिया‌

ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेप्रमाणे, १२ वर्षाच्या मुलाला सत्कर्म आणि दुष्कर्म यातील फरक समजतो. त्यामुळे अशा मुलाने वाईट काम केले तर त्याला बालगुन्हेगार न समजता सर्वसाधारण गुन्हेगारच समजले जाते. अशा गुन्हेगारांना जशी सजा मोठ्या माणसांना दिली जाते तशीच सजा दिली जाते.

जपान

जपानमध्ये २० वर्षे वयापर्यंतच्या मुलांना अजाण समजले जाते, परंतु तेथे गंभीर गुन्ह्यांसाठी याहून लहान मुलांनाही अपराधी समजले जाते. २०१०साली ऑस्ट्रेलियात १९ वर्षे वयाच्या मुलाला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली गेली होती. त्या मुलाने दोन स्त्रियांची हत्या केली होती. जपानमध्ये १२ वर्षे वयाच्या मुलाला करारमदार करण्याचा किंवा मृत्युपत्र करण्याचा अधिकार मिळतो, त्यमुळे गंभीर गुन्ह्यांसाठी १५ वर्षाच्या वयातही कडक शिक्षा होऊ शकते. तैवान, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंडमध्ये साधारणपणे असेच कायदे आहेत.

भारत‌‌

भारतात सात वर्षे वयापेक्षा कमी वयाच्या मुलाने केलेल्या कृत्याला अपराधच समजले जात नाही. ७ ते १२ वर्षाच्या मुलाला, त्याने केलेल्या कृत्याच्या परिणामांची जाणीव नसते, या कारणाने त्याने केलेल्या अपराधाबद्दल त्याला सजा होत नाही. यानंतर १८ वर्षे वयापर्यंतच्या मुलाला किशोर समजले जाते आणि त्याच्या हातून झालेल्या गुन्ह्यासाठी त्याला बालसुधारगृहात पाठविले जाते. २०००सालापर्यंत यासाठी १६ वर्षे वयाची मर्यादा होती.

 


 

For suggestions or queries: Contact us at  info@msakshar.in

Subscribe to our Newsletter Click Here

Follow us at, Facebook | Instagram 

 

Web Search: 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *