मोबाइल चार्जिंग करताना ‘या’ चुका करू नका, फोनला होतेय ‘हे’ नुकसान

मोबाइल चार्जिंग करताना ‘या’ चुका करू नका, फोनला होतेय ‘हे’ नुकसान (Do not make ‘these’ mistakes while charging the mobile, it is a ‘damage’ to the phone)

 

स्मार्टफोनमध्ये असंख्य अॅप्स असल्याने तसेच त्याचा वापर वाढल्याने स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे फोनला वारंवार चार्जिंग करावे लागते. परंतु, चार्जिंग करताना अनेक जण चुकीच्या पद्धतीने फोनला चार्ज करीत असल्याने याचा फोनच्या बॅटरीवर परिणाम होतो.

 

msakshar-article-dont-make-mistakes-while-charging-mobile-image-1

 

NOTE:

  • मोबाइल चार्जिंग करताना काही चुका टाळा
  • फोनला व्यवस्थित चार्जिंग केले तर बॅटरी चांगली राहिल
  • फोनला कधी चार्जिंग करावे किंवा करू नये, पाहा

 

नवी दिल्लीः सध्या प्रत्येक जण स्मार्टफोनचा वापर करीत आहे. दिवसभर मोबाइलचा वापर केल्यानंतर याची बॅटरी संपते. त्यामुळे तुम्हाला वारंवार मोबाइलला चार्ज करावे लागतात. काही जण मोबाइल चार्ज करताना अशा काही चुका करीत असतात. त्यामुळे फोनचे नुकसान होते. तसेच चुकीच्या पद्धतीने चार्ज केल्याने फोनची बॅटरीवर परिणाम होतो. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशाच काही चुकांबद्दल माहिती सांगणार आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

 

विना कवर चार्ज करा फोन

अनेकदा लोक कवर सोबत फोन चार्जिंगला लावू देतात. असे करू नका. मोबाइल कवर सोबत चार्जिंग केल्याने फोनच्या बॅटरीवर दबाव पडतो. तसेच बॅटरी खराब होण्यचाी भीती असते. त्यामुळे फोन चार्ज करीत असताना कवर काढून टाका.

 

चार्जिंग अॅपपासून दूर राहा

अनेकदा फोनला लवकर चार्ज करण्यासाठी आपण फास्ट चार्जिंग अॅपला डाउनलोड करीत असतो. खरं म्हणजे, हे अॅप फोनच्या बॅकग्राउंडला लागोपाठ चालत असतात. त्यात बॅटरीची जास्त खर्च होते. त्यामुळे फोनच्या बॅटरीला सुरक्षित ठेवायचे असल्यास अशा अॅप्सपासून दूर राहणे चांगले आहे.

 

बॅटरी २० टक्के झाल्यानंतर फोन चार्ज करा

फोनची बॅटरी जर २० टक्के झाली किंवा त्यापेक्षा कमी झाल्यानंतर फोनला चार्ज करणे चांगले आहे. त्यामुळे फोनच्या बॅटरीवर कोणताही परिणाम होत नाही.

 

ओरिजनल चार्जरचा वापर करा

फोनची बॅटरी खऱाब होऊ नये, असे तुम्हाला वाटत असेल तर आपल्या स्मार्टफोनला नेहमी ओरिजनल चार्जरने चार्ज करा. जर तुम्ही दुसऱ्या किंवा लोकल चार्जरने फोन चार केल्यास त्याचा परिणाम बॅटरीवर पडू शकतो. वारंवार अन्य चार्जरने फोन चार्ज केल्यास फोनची बॅटरी खराब होऊ शकते.

 

वारंवार चार्ज करू नका

काही लोक मोबाइलला वारंवार चार्ज करतात. बॅटरी ९० टक्के असल्यावरही ते चार्ज करतात. स्मार्टफोनला वारंवार चार्ज केल्याने त्याचा परिणाम बॅटरीवर पडत असतो. त्यामुळे फोनला वारंवार चार्ज करणे टाळावे.

 


 

For suggestions or queries: Contact us at  info@msakshar.in

Subscribe to our Newsletter Click Here

Follow us at, Facebook | Instagram 

 

Web Search: mobile charging, phone charger, wireless phone charger, portable phone charger, solar phone charger, iPhone se wireless charging, power bank charger, iPhone xr charger, iPhone battery pack, portable power bank, iPhone power bank

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *