रोटरीतर्फे वंचितांची दिवाळी उपक्रम
संगमनेर, : गेल्या पाच वर्षांपासून प्रत्येक दिवाळी सणानिमित्त सुरु असलेल्या संगमनेर रोटरी क्लबचा वंचितांची दिवाळी हा प्रकल्प याही वर्षी पिंपरणे येथे राबविण्यात आला.
पिंपरणे : वंचितांची दिवाळी उपक्रमांतर्गत ऊस तोडणी कामगारांच्या वस्तीवरील महिलांना रोटरीतर्फे किराणा व साडी भेट म्हणून देण्यात आली.
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहून, वंचित कुटुंबीय तसेच तळागाळातील समाजासाठी मदत करणाऱ्या रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
सध्या साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला सुरवात झाली आहे. ऊस तोडणीच्या कामासाठी आपले गाव शिव सोडून दुसऱ्या जिल्ह्यात आलेल्या ऊस तोडणी कामगार भगिनींची दिवाळी आनंदात जावी, त्यांच्या भावाची उणीव भरुन निघावी हा या प्रकल्पामागील मुख्य हेतू असल्याचे रोटरीचे अध्यक्ष हृषिकेश मोंढे व सचिव आनंद हासे यांनी सांगितले.
यावर्षी मालेगाव येथून संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे सुमारे १२० कुटुंबीयांनी आपली तात्पुरती वस्ती वसवली आहे. या वस्त्यांवरील ११० महिला भगिनींना दिवाळीसाठी किराणा, साहित्य व साडी अशी भेट याप्रसंगी देण्यात आली.
पदाधिकाऱ्यांचे औक्षण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.येथे आलेल्या कुटुंबीयांची निवड सुनील घुले यांनी प्रकल्पाची संकल्पना समजावून सांगितले. या प्रकल्पासाठी करण्यात आली. प्रकल्प प्रमुख म्हणून म्हणून रमेश दिवटे, सोनू राजपाल, ओंकार सोमाणी, अमोल मुळे यांनी काम पाहिले. तर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व रोटरी क्लब सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी सदस्य व गावकरी उपस्थित होते.